Posts

Showing posts with the label Fungicide

Bordo Pest बोर्डो मिश्रण रोगनियंत्रणासाठी

Image
  💧बोर्डो मिश्रण💧 पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण हे एक अतिशय परिणामकारक बुरशीनाशक आहे. प्रा. पी. ए. मिलार्डेट यांनी इ.स. 1882 मध्ये प्रथम मोरचूद आणि चुना यांचे मिश्रणाचा वापर फ्रान्समध्ये द्राक्षावरील केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी केला. महाराष्ट्रात अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळझाडे या पिकांवरील बुरशीजन्य रोगांवर एक प्रभावी उपाय म्हणून बोर्डो मिश्रणाचा उपयोग केला जातो. 💧बोर्डो मिश्रण तयार करताना घ्यावयाची काळजी - - कळीचा चुना वापरताना तो दगडविरहित असावा. - मिश्रण करताना कोणत्याही धातूच्या भांड्याचा वापर करू नये. - फवारणी होईपर्यंत प्लॅस्टिक ड्रममध्ये मिश्रण साठवावे. - दोन अलग केलेली द्रावणे एकमेकांत मिसळताना थंड असावीत. - फवारणीसाठी मिश्रण वस्त्रगाळ करून वापरावे. - पावसाळ्यात मिश्रण वापरताना चिकट द्रव (स्टिकर) सोबत वापरावे. - मिश्रण बनविण्यासाठी चांगले पाणी वापरावे. क्षारयुक्त पाणी वापरू नये. - विरी गेलेला चुना किंवा भुकटी वापरू नये. - मिश्रण ढवळताना लाकडी किंवा प्लॅस्टिक काठीचाच वापर करावा. 💧 बोर्डो मिश्रण तयार करण्