🌧️ कापूस पिकावर अधिक पाऊस: समस्या व उपाय
🌧️ कापूस पिकावर अधिक पाऊस: समस्या व उपाय कापूस हे खरीपातील महत्त्वाचे नगदी पीक आहे. साधारणपणे मध्यम पर्जन्यमान (७५०-१००० मिमी) असलेल्या भागात ते चांगले येते. पण सध्या हवामानातील अनियमिततेमुळे अनेक भागात जास्त पाऊस होत आहे. या अतिरिक्त पावसाचा कापूस पिकावर गंभीर परिणाम दिसून येतो. 📌 जास्त पावसामुळे होणाऱ्या समस्या 1. मुळांचा श्वास गुदमरतो – जमिनीत पाणी साचल्याने मुळांची वाढ कमी होते. 2. पानगळ व पिवळसरपणा – नायट्रोजनची धूप होते. 3. किड व रोग प्रादुर्भाव कीड : मावा, पांढरी माशी, तुडतुडे रोग : मुळकुज, खोडकुज, पानांवर डाग 4. फुलगळ व चौपटे कमी होणे 5. जमिनीची भुसभुशीतपणा नष्ट होणे ✅ उपाययोजना 1. पाणी व्यवस्थापन शेतात पाणी साचू देऊ नये. जलनिस्सारण व्यवस्था (ड्रेनेज) करणे. वाफसा आला की जमिनीला अंतरमशागत करणे. 2 . खत व्यवस्थापन पावसानंतर अमोनियम सल्फेट / युरिया थोड्या प्रमाणात टॉपड्रेसिंग करणे. सूक्ष्मअन्नद्रव्ये (झिंक, मॅग्नेशियम, बोरॉन) फवारणीने देणे. ५० ग्रॅम युरिया + २५ ग्रॅम DAP + १ लि. १९:१९:१९ द्रावण /१० लि. पाणी पानांवर फवारावे. 3. किडनियंत्रण पिवळे/निळे स्टिकी ट्रॅप्स लावणे. ...