Water Management For Fruit Trees


✍💧🔵 पाणी व्यवस्थापन🔵💧✍
........................................................
💧💧💧💧💧💧💧💧💧💧

⚫️ पाणी व्यवस्थापन व झाडाचा ....आकार वृध्दी - आंतर संबंध ⚫️
           डाळींब बाग असो की, द्राक्षाची वेल असो की कोणतही झाड , पाणी त्या झाडाची दुपारी १२ वाजता पडणाऱ्या सावली पासून ६ते ९ इंच दूर दिले पाहिजे .
     आपण पाणी जेव्हा सावलीचे आत देतो, तेव्हा मुळीला जागेवर पाणी मिळते , त्यामुळे पाणी घेण्या साठी मूळीला आपली लांबी वाढविण्याचे विनाकारण कष्ट.... घेण्याचे काहीही कारण उरत नाही.
परंतू-
जेव्हा आपण सावलीचे ६ते ९ इंच बाहेर पाणी देतो , तेव्हा जागेवर पाणी मिळणे बंद झाल्यामुळे नाइलाजाने का होईना,आता..... मुळीला वाफसा घेण्यासाठी सावली बाहेर यावेच लागते . जेव्हा मुळी सावली बाहेर येते, तेव्हा -
अर्थात तिची लांबी वाढते . तिची
लांबी वाढली की गोलाई वाढते . कारण - लांबी आणि गोलाई ह्यांचे आपसात निसर्गाने ठरविलेले..... गुणोत्तर आहे .
     मुळीची गोलाई वाढली की खोडाची गोलाई आपोआपच वाढते
कारण निसर्गाने त्यांचे सुध्दा गुणोत्तर निश्चित केलेले आहे . अर्थात खोडाची गोलाई वाढली की खोडाची म्हणजेच झाडाची उंची आपोआप वाढते . उंची वाढली की आकार वाढतो .
    झाडाचा आकार वाढला की त्याचे गुणित प्रमाणात झाडांवर असलेली पानांची एकुण संख्या वाढते , तसं पानांचं अन्न तयार करणारं क्षेत्रफळ त्याचपटीनं वाढतं .
     अर्थात पानांची संख्या वाढली की त्यांची त्याच पटीने ......अन्न निर्मीती वाढते ,शेवटी अन्न निर्मिती
वाढली की , डाळींबाचे व इतर पिकांचे उत्पादन ही त्याच प्रमाणात वाढते.
तेव्हा -
   पाणी व्यवस्थान हा झिरो बजेट शेतीचा महत्वाचा विषय असल्याने त्याचे काटकोरपणे पालन करावे .
                                                                  ⚫️🔵⚫️🔵⚫️🔵⚫️
*संपर्क*

💧जैन ठिबक 💧
💧🙏श्री रेणूकामाता ईरिगेशन, धुळे 💧🙏
संपर्क-: प्रदीप पाटील
मोबाईल नंबर-:9404558958 & 7743984852
Email- sri.dhule@gmail.com 

Comments

Popular posts from this blog

कापसावरील रोग

Bordo Pest बोर्डो मिश्रण रोगनियंत्रणासाठी

कापूस पिकावरील किड ओळख