कापूस पिकातील रसशोषक किडींचे नियंत्रण / Control Sucking Pest on Cotton





☀ कापूस पिकातील रसशोषक किडींचे नियंत्रण ☀

कापूस या पिकाची लागवड महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भात, आणि खानदेशात  मोठ्या प्रमाणावर होते.  कपाशीवर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे,पिठ्या ढेकुण आणि लालकोळी या किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी खालील उपाय योजावेत.

 जैविक कीड नियंत्रण
Ladybird Beetle -Predators लेडी बर्ड बीटल (ढाल्या कीड)

याचे प्रौढ व अळ्या प्रामुख्याने मावा किडीवर उपजीविका करतात. शेतात जर असे मित्रकीटक दिसून येत असल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर शक्यतो टाळावा. लेडीबर्ड बीटलच्या बऱ्याच प्रजाती आहेत .
लेडीबर्ड बीटल हि
 मावा (Aphids/अफीड्स) ,
पांढरी माशी (White fly /व्हाईटफ्लाय)
 लहान अळी   (Small Caterpillars )
    कोळी  (Spider Mite)
 या सर्व किडीच्या वर जगते व या किडीची शिकार करते .




कपाशीवरील किडींचे नैसर्गिक शत्रू कीटक (मित्रकीटक) जसे कि चतुर,प्रार्थना कीटक, सरफीड माशी, कतीन,पेन्टाटोमिड ढेकुण इत्यादी मित्रकीटकांचे संगोपन करावे.

वनस्पतीजन्य किंवा जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. ५ % निंबोळी अर्क अथवा अझाडीरेक्टीन १०००० पीपीएम १ मिली प्रती लिटर  किंवा १५०० पीपीएम २.५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पिठ्या ढेकुण किडीच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लेकानी ४ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 *रासायनिक कीड नियंत्रण*

तुडतुडे,फुलकिडे, मावा पांढरी माशी व लाल कोळी या किडींच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी (प्रमाण प्रती १० लिटर पाण्यासाठी)

*तुडतुडे, फुलकिडे,  मावा*
  • फ्लोनीकॉमिड ५० डब्लूजि (उलला) २ ग्रॅम
  •  बुप्रोफेझिन २५ एससी(अँपलॉड)  २० मिली
  • डायफेन्थुरोन ५० डब्लूपी(पोलो)  १२ ग्रॅम
  • फिप्रोनील ५ एससी(रिजेंट)  ३० मिली
  • अँसिफेट ७५एसपी(असाटाफ)  ८ ग्रॅम

 *पांढरी माशी

  1. निंबोळी तेल ५ टक्के ५० मिली
  2. फ्लोनीकॉमिड ५० डब्लूजि (उलला) २ ग्रॅम
  3. बुप्रोफेझिन २५ एससी(अँपलॉड)  २० मिली
  4. डायफेन्थुरोन ५० डब्लूपी(पोलो)  १२ ग्रॅम
  5. अँसिफेट ७५एसपी(असाटाफ)  ८ ग्रॅम
  6. स्पायरोमेसिफेन (ओबेरॉन) २२.९ एससी १२ मिली

 * लाल कोळी

  • डायकोफॉल १८.५ ईसी (केलथेन) ५४ मिली
  • स्पायरोमेसिफेन (ओबेरॉन) २२.९ एससी १२ मिली



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कापसावरील रोग

Bordo Pest बोर्डो मिश्रण रोगनियंत्रणासाठी

कापूस पिकावरील किड ओळख