सेंद्रिय शेती / Organic Farming




सेंद्रिय शेती = विषमुक्त शेती
Organic Farming = Poison Free Farming 
✔ गांडुळाच्या पोटामध्ये प्रचंड शक्ती असते.
✔ त्याला भूक लागली की, काही तरी खावेसे वाटते, परंतु काय खावे आणि काय खाऊ नये, याची निवड त्याला करता येत नाही.
✔ कारण त्याला डोळे नसतात.
✔ त्यामुळे ज्याचा स्पर्श होईल त्याला ते खात सुटते.
✔ जमिनीच्या आत बिळे करून राहण्याची त्याची प्रवृत्ती असते.
✔ त्यामुळे त्याला मातीचा स्पर्श होत राहतो आणि स्पर्श होईल ती माती खात ते सुटते आणि दिवसभरात भरपूर माती खाते.
✔ ती माती त्याची भूक भागवायला उपयोगी नसते.
✔ परंतु टनभर माती खाल्ल्यानंतर त्याची भूक भागण्यास आवश्यक असे थोडे बहुत द्रव्य त्याला त्या मातीतून खायला मिळते.
✔ निसर्गाने त्याच्या पोटामध्ये ती माती पचवण्याची शक्ती निर्माण केलेली आहे.
✔ या निमित्ताने गांडुळ २४ तास वळवळ करत राहते आणि माती उकरून खाते.
✔ त्यामुळे शेतातली जमीन भुसभुशीत होते.
✔ अन्यथा हे काम करायला शेकडो रुपये देऊन ट्रॅक्टर तरी आणावा लागतो, किंवा सहा बैली नांगराने शेत नांगरावे लागते.
✔ तेच काम गांडुळ करत असल्यामुळे जमीन आयतीच भुसभुशीत होऊन तिच्यातून हवा खेळणे शक्य होते.
✔ ज्या जमिनीत भरपूर हवा खेळते त्या जमिनीतल्या पिकांच्या मुळांना हवा भरपूर मिळते.
✔ पिकांच्या मुळाशी पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्म जीवाणूंची संख्याही वाढते.
✔ त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.
✔ हे सारे करत असताना जमिनीतली माती गांडुळाच्या पोटातून काही प्रक्रिया होऊन विष्ठेच्या रूपाने पुन्हा बाहेर पडते आणि आयतेच खत जमिनीला मिळतो.
✔ विष्ठेच्या बरोबरच गांडुळाच्या शरीरातून म्हणजे त्वचेतून काही द्रव्ये बाहेर पडत असतात. या द्रव्यांचा उपयोग पिकांची वाढ करण्यासाठी ग्रोथ प्रमोटर म्हणून होत असतो.
✔ गांडुळाच्या विष्ठेमध्ये सभोवतालच्या मातीच्या तुलनेत नायट्रोजनचे म्हणजे नत्राचे प्रमाण पाच पट जास्त असते.
✔ त्याच्या विष्ठेत स्फूरद सात पटीने जास्त तर पालाश अकरा पटीने जास्त असतो.
✔ मुक्त चुनांश, मॅगनीज आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा दुपटीने जास्त असतात.
✔ गांडुळांची जन्म-मरणाची साखळी सुरू असते.
✔ शेकडो पिलांना जन्म देऊन एखादे गांडुळ मरण पावते तेव्हा सुद्धा ते शेतकर्‍यांच्या उपयोगी पडते.
✔ गांडुळाच्या शरीराचा सुद्धा खत म्हणून उत्तम उपयोग होत असतो.
✔ त्याच्या मृत शरीराच्या वजनाच्या ७२ टक्के इतके प्रोटिन्स किंवा प्रथिने असतात.
✔ त्याचे शरीर लवकर कुजते आणि त्यातून जमिनीला नत्राचा पुरवठा होतो.
✔ सर्वसाधारणपणे मेलेल्या एका गांडुळापासून दहा मिलीग्रॅम नायट्रेट मिळते.
✔ गांडुळाचा खत म्हणजे प्रामुख्याने गांडुळाची विष्ठा.
✔ या विष्ठेचे विश्‍लेषण केले असता त्यामध्ये नत्र पालाश आणि स्फूरद हे तर जास्त असल्याचे आढळले आहेच. परंतु त्यात इतरही काही गोष्टी आढळलेल्या आहेत.
✔ जमिनीमध्ये सर्वसाधारणत: जेवढे जीवाणू असतात त्याच्या दहा ते पंधरा पट अधिक जीवाणू त्याच्या विष्ठेमध्ये असतात.
✔ तिच्यामध्ये पिकांना उपयुक्त असलेली बुरशी आणि ऍक्टीनोमायसिटीस् असतात.
✔ हवेतला नत्र जमिनीत स्थिर करणारे ऍझोटोबॅक्टर सारखे जीवाणूही गांडुळाच्या विष्ठेमध्ये मोठ्या संख्येने आढळतात.
✔ त्याच्या विष्ठेमध्ये असलेले नेकार्डिया ऍक्टीनोमासिटस् किंवा स्ट्रेप्सोमायसेस यासारखे सूक्ष्म जीवाणू औषधासारखे काम करतात आणि पिकांवर पडणार्‍या रोगांवर इलाज करतात.
✔ गांडुळाचे आतडे हे एक यंत्रच आहे.
✔ त्याच्या आतड्यामध्ये मातीचे रुपांतर खतात करणारे शंभरहून अधिक जीवाणू सतत कार्यरत असतात.
✔ गांडुळाचे हे सारे गुणधर्म पाहिले म्हणजे गांडुळ हा शेतकर्‍यांचा कसा मित्र आहे हे लक्षात येईल आणि गांडुळाची मदत घेऊन शेती करणे कसे बिनखर्ची शेती करण्यास उपयोगाचे आहे हेही ध्यानात येईल.
✔ गांडुळाचे आणखी काही महत्वाचे उपयोग आहेत.

_ते पाहिले म्हणजे गांडुळाला वगळून शेती करणे हा किती मोठा अपराध आहे आणि हा अपराध करून आपण आपल्याच पायावर कसा दगड मारून घेत असतो हे लक्षात येईल._

✔ त्याच्या पोटात निसर्गाने ठेवलेल्या भट्टीत त्याचे खत तयार होते आणि ते विष्ठेतून बाहेर पडते.
✔ ती खतयुक्त विष्ठा मात्र पाण्यात पटकन विरघळते आणि ते विष्ठायुक्त खत मात्र पिकांच्या मुळांना शोषून घेता येते.
✔ म्हणजे ही सारी प्रक्रिया घडायला काही वेळ लागतो.
✔ म्हणूनच आपल्या शेतातली शेणखतासारखी सेंद्रीय खते पिकांना ताबडतोब उपयोगी करून देण्याचे काम गांडूळ करत असतो.
✔ म्हणजे गांडूळ हे पिकांसाठी खाद्य तयार करणारे स्वयंपाकघर किंवा भटारखाना आहे.
✔ हा भटारखाना म्हणजे खताचा कारखाना सुद्धा आहे.
✔ गांडुळाला दृष्टी नसते आणि ज्याला स्पर्श होईल ते खात सुटते आणि खाता खाता शेतातल्या मातीमध्ये असलेले अनेक रोगजंतू ते भस्त करत असते.
✔ म्हणजे आपले शेत स्वच्छ ठेवण्यासाठी आणि रोगजंतूंपासून मुक्त ठेवण्यासाठी गांडुळाचा उपयोेग दवाखाना म्हणून होत असतो.
✔ अनेक प्रयोगांमध्ये असे आढळून आले आहे की, ज्या शेतात गांडूळ भरपूर प्रमाणात असतात त्या शेतांमध्ये पिकावर रोगही कमी पडतात.
✔ कीडी आणि कृमींपासून होणारे रोग गांडुळामुळे टळत असल्यामुळे पुढे होणारे नुकसान टळते.
✔ कीडींमुळे आणि रोगांमुळे पिकांवर औषधे मारावी लागतात. त्या औषधांवरचा खर्च गांडुळामुळे वाचतो.
✔ अशा रितीने गांडूळ शेतामध्ये होणारे दोन मुख्य खर्च वाचवते.
पहिला खर्च रासायनिक खतांचा आणि दुसरा खर्च जंतूनाशकांचा आणि औषधांचा.
✔ गांडूळ बिळ करून राहते आणि त्यासाठी माती उकरत राहते.
✔ त्याच्या या माती उकरण्याच्या प्रक्रियेत जमिनीच्या खालच्या थरातली माती वर येते आणि वरच्या थरातली माती खाली नेऊन सोडली जाते.
✔ मातीची ही अदलाबदल मृदशास्त्रानुसार पिकांसाठी उपयुक्त असते आणि गांडूळ हे सारे काम कसलाही पगार न घेता करत असते.

*अतिशय महत्वाचे
▪आपल्या शेतात आपण पिकांना रासायनिक खते देतो.
▪अशी तयार खते बाजारात मिळतात आणि ती पाण्यात सहज विरघळतात.
▪त्यामुळे पिकांना ती दिली की, पाण्यात विरघळून तयार झालेले खतयुक्त पाणी झाडांची किंवा पिकांची मुळे शोषून घेतात.
▪ही सारी प्रक्रिया एक-दोन दिवसात घडते.
▪त्यामुळे रासायनिक खते पिकांना ताबडतोब लागू होतात आणि त्याचे आपल्याला कौतुक वाटायला लागते.
▪शेणखत किंवा गावखत यांची अवस्था अशी नसते.
▪ती पटकन शोषून घेता येत नाहीत.
▪शेतात पडलेले शेणखत, काडी-कचरा हे खत म्हणून पिकांना ताबडतोब उपयोगी पडत नाहीत.
▪मात्र ही खते किंवा शेतातले कोणतेही सेंद्रीय पदार्थ आधी गांडूळ खातो.
▪जमिनीमध्ये रासायनिक खते दिली तर गांडूळाच्या पोटामध्ये हि खते जाऊन गांडूळ मरण पावतात व त्यांची पुनरनिर्मितीची प्रक्रिया बंद होते.
▪म्हणूनच गांडूळ जिवंत राहण्यासाठी शेणखत व इतर जैविक खते) किंवा सेंद्रिय खते गरजेची आहेत.

*सेंद्रिय शेती। नैसर्गिक शेती।*

*विषमुक्त शेती। विषमुक्त भारत।

*Jain Irrigation System Ltd*
Dealer
*💧श्री रेणुकामाता ईरीगेशन ,वलवाडी धुळे💧*
*9404558958,  7743984852*
Email-: sri.dhule@gmail.com 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कापसावरील रोग

Bordo Pest बोर्डो मिश्रण रोगनियंत्रणासाठी

कापूस पिकावरील किड ओळख