Posts

सेंद्रिय शेती / Organic Farming

Image
सेंद्रिय शेती = विषमुक्त शेती Organic Farming = Poison Free Farming   ✔ गांडुळाच्या पोटामध्ये प्रचंड शक्ती असते. ✔ त्याला भूक लागली की, काही तरी खावेसे वाटते, परंतु काय खावे आणि काय खाऊ नये, याची निवड त्याला करता येत नाही. ✔ कारण त्याला डोळे नसतात. ✔ त्यामुळे ज्याचा स्पर्श होईल त्याला ते खात सुटते. ✔ जमिनीच्या आत बिळे करून राहण्याची त्याची प्रवृत्ती असते. ✔ त्यामुळे त्याला मातीचा स्पर्श होत राहतो आणि स्पर्श होईल ती माती खात ते सुटते आणि दिवसभरात भरपूर माती खाते. ✔ ती माती त्याची भूक भागवायला उपयोगी नसते. ✔ परंतु टनभर माती खाल्ल्यानंतर त्याची भूक भागण्यास आवश्यक असे थोडे बहुत द्रव्य त्याला त्या मातीतून खायला मिळते. ✔ निसर्गाने त्याच्या पोटामध्ये ती माती पचवण्याची शक्ती निर्माण केलेली आहे. ✔ या निमित्ताने गांडुळ २४ तास वळवळ करत राहते आणि माती उकरून खाते. ✔ त्यामुळे शेतातली जमीन भुसभुशीत होते. ✔ अन्यथा हे काम करायला शेकडो रुपये देऊन ट्रॅक्टर तरी आणावा लागतो, किंवा सहा बैली नांगराने शेत नांगरावे लागते. ✔ तेच काम गांडुळ करत असल्यामुळे जमीन आयतीच भुसभुशीत होऊन तिच्या...

कापसावरील रोग

Image
कापसावरील रोग कापसावर करपा, मर (फ्युजेरियम विल्ट, व्हर्टीसिलीयम विल्ट न्युविल्ट ऑफ कॉटन) मुळकुजव्या, कवडी, दह्या पानावरील ठिपके,लाल्या, मरोडीया हे रोग प्रामुख्याने आढळतात. १) करपा / Cotton Verticillium-: रोगाची लक्षणे व नुकसानीचा प्रकार : झान्थोमोनॉस कापेस्ट्रिस पी. व्ही मालव्हेसिअरम या जीवाणूमुळे करपा हा रोग होतो. साधारणपणे झाड ५ ते ६ आठवड्याचे असताना पानाच्या खालील बाजूस काळ्या रंगाचे कोनात्मक ठिपके दिसू लागतात. नंतर अशाच प्रकारचे ठिपके पानाच्या वरील बाजूसही तयार होतात. पानाच्या शिरा, पानाचे देठ, काळे पडतात. पानावरील ठिपक्यांचा आकार वाढून ठिपके एकमेकांत मिसळून पुर्ण पान करपून गळून पडते. करप्यामुळे पानातील हरीत द्रव्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कर्बग्रहणाची क्रिया मंदावते. पानाप्रमाणे खोडावरही काळे ठिपके पडतात. खोडाला भेगा पडून झाडे वार्‍याने मोडतात. रोगट झाडावरील पात्या, फुले, कळ्या गळून पडतात. मोठी बोंडे व आतील कापूस सडतो. बोंडावर वरून काळे डाग पडतात. आतील कापसाचा रंग पिवळसर पडून प्रत खालावते. परिणामी बाजारभाव कमी मिळतात. A) रोगाचा प्रसार प्रथम बियाणांपासून होतो. रोगाच...

कापूस पिकावरील किड ओळख

Image
कापूस पिकावरील किड व रोगांची ओळख १) मावा : माव्याचा जीवनक्रम :- मावा हा किटक लहान (१ ते २ मिमी ), मऊ शरीर असलेले पिवळसर, हिरवट, तपकिरी किंवा काळसर हिरवट रंगाचे असून झाडाच्या कोवळ्या भागावर आढळतो, ह्या किडीच्या पोटाच्या वरील भागावर दोन सुक्ष्म नलिका असून त्याद्वारे ही कीड चिकट, गोड द्रव बाहेर टाकते. हा द्रव खाण्यासाठी मुंग्या रोपावर आढळतात. ह्या मुंग्याच्या पाठीवर माव्याची पिले बसून ती एका झाडावरून दुसर्‍या झाडावर जातात. ही कीड अंडी घालीत नाही. तिचे प्रजनन संयोगाविना होत असते. माद्या बिन पंखाच्या, आकाराने मोठ्या, फिक्कट रंगाच्या असतात. एक मादी दररोज ८ ते २२ पिलांना जन्म देते. पिले चार वेळा कात टाकून प्रौढावस्थेत जातात. किडीची वाढ ७ ते ९ दिवसात पुर्ण होऊन पौढ मावा २ ते ३ आठवडे जगतो. वर्षभरात १२ ते १४ पिढ्या उपजतात. माव्या पासून होणारे नुकसान :- मावा हा कोवळ्या पानाच्या खालच्या बाजूला समूहाने राहून रस शोषतो. परिणामी झाडे कमजोर होऊन पाने मुरडतात. पानांचा रंग फिक्कट पडतो. माव्याचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास झाडे कापल्यासारखी दिसतात. यामध्ये जुन्या झाडांपेक्षा कोवळ्या झाडांचे नुक...
Image
JAIN DRIP BUNDAL/LATERAL   INLINE AND ONLINE  We are JAIN  IRRIGATION SYSTEM LTD JALGAON Wholesaler Shri Renukamata Irrigation (SRI) in irrigation systems working experience 11 years.   Our Specialty to other   *Survey Drip Irrigation project area Free of cost. Perfect recommended as on condition.  *Create Quotation as per farmers Requirements like crop, soil conditions, water conditions.  *Farmers Freely Support for apply Subsidy registration and Time to time Updated to farmers.  *Freely farmers Guides for Fertigation Schedule as per their crops.   All types of Irrigation System available means Subsidy and non-subsidy in wholesale Rate.  Emitting Pipe play a key role in irrigation systems.  Add caption