Posts

ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय

व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;  १ हेक्टर = १०००० चौ. मी .  १ एकर = ४० गुंठे  १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट  १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे १ आर = १ गुंठा  १ हेक्टर = १०० आर १ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट १ चौ. मी . = १०.७६ चौ फुट  ७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत. नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!  जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!! कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे. ग्रामपंचायत  एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. ग्रामपंचायत म्हणजेच राज्य शासनाचे विविध कार्य राबविणारे एक

Drip System General Maintenance ठिबक सिंचन संचाची देखभाल

Image
ठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल                 ठिबक सिंचन संचाची काळजी, देखभाल ठिबक सिंचन संचाची कार्यक्षमता कायम राखण्यासाठी संचाची वेळोवेळी देखभाल करणे गरजेजे आहे. जेणेकरून वेळेची, उर्जेची बचत होते व संचाचे जीवनमान वाढते.  पंपाची देखभाल:- पंपाच्या पुढे एक पाणी मोजण्याचे यंत्र (वॉटर मीटर) बसवावे पाण्याचा प्रवाह किंवा पाण्याचादाब आवश्यकतेपेक्षा कमी अधिक झाल्यास पंप तपासून त्याची कारणे शोधावीत व दुरुस्ती करावी. दर दोन दिवसांनी पंपाचा आवाज, त्याचे तापमान, गळती तपासावी. विद्युत मोटार, स्विचेस, मीटर व स्टार्टर यांची उत्पादकाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार निगा ठेवावी. ठिबक सिंचन संचाच्या गाळण यंत्रणेची देखभाल स्क्रीन फिल्टरची स्वच्छता--

Water Management For Fruit Trees

Image
✍💧🔵 पाणी व्यवस्थापन🔵💧✍ ........................................................ 💧💧💧💧💧💧💧💧💧💧 ⚫️ पाणी व्यवस्थापन व झाडाचा ....आकार वृध्दी - आंतर संबंध ⚫️             डाळींब बाग असो की, द्राक्षाची वेल असो की कोणतही झाड , पाणी त्या झाडाची दुपारी १२ वाजता पडणाऱ्या सावली पासून ६ते ९ इंच दूर दिले पाहिजे .      आपण पाणी जेव्हा सावलीचे आत देतो, तेव्हा मुळीला जागेवर पाणी मिळते , त्यामुळे पाणी घेण्या साठी मूळीला आपली लांबी वाढविण्याचे विनाकारण कष्ट.... घेण्याचे काहीही कारण उरत नाही. परंतू- जेव्हा आपण सावलीचे ६ते ९ इंच बाहेर पाणी देतो , तेव्हा जागेवर पाणी मिळणे बंद झाल्यामुळे नाइलाजाने का होईना,आता..... मुळीला वाफसा घेण्यासाठी सावली बाहेर यावेच लागते . जेव्हा मुळी सावली बाहेर येते, तेव्हा - अर्थात तिची लांबी वाढते . तिची लांबी वाढली की गोलाई वाढते . कारण - लांबी आणि गोलाई ह्यांचे आपसात निसर्गाने ठरविलेले..... गुणोत्तर आहे .      मुळीची गोलाई वाढली की खोडाची गोलाई आपोआपच वाढते कारण निसर्गाने त्यांचे सुध्दा गुणोत्तर निश्चित केलेले आहे . अर्थात खोडाची गोलाई वाढल

Mulching 50 Benefits / मल्चिंग चे ५o चमत्कार...

Image
                              ⍖ Mulching 50 Benefits /   मल्चिंग चे ५o चमत्कार. ⍖ Type of Mulching A)          Organic Mulching -: In Organic mulching Use Grass, Dry Leaves, Wheat Straw, Compost, Saw Dust, and News Paper & Bark. B)          Inorganic Mulching -: Stones, Gravel & Plastic Mulching                  १ ) तणांचा कायमचा बंदोबस्त होतो . २ ) पाण्याची ५० % बचत होते . ३ ) सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते . ४ ) जमिनीची सुपिकता वाढते . ५ ) जमिनीचा पोत वाढतो . ६ ) हवेतील ओलावा ओढून घेते . ७ ) नत्र उपलब्ध होते . ८ ) प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा 'वेग वाढतो. ९ ) सजिवता वाढते . १० ) पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते. ११ ) जमिनीत संजिवकांची निर्मिती होते . १२ ) जमिनीत नविन घडण होते . १४ ) पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. १५ ) स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो. १६ ) आंतरकाष्टांगजन्य विघटन. १७ ) मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते. १८ ) सर

सेंद्रिय शेती / Organic Farming

Image
सेंद्रिय शेती = विषमुक्त शेती Organic Farming = Poison Free Farming   ✔ गांडुळाच्या पोटामध्ये प्रचंड शक्ती असते. ✔ त्याला भूक लागली की, काही तरी खावेसे वाटते, परंतु काय खावे आणि काय खाऊ नये, याची निवड त्याला करता येत नाही. ✔ कारण त्याला डोळे नसतात. ✔ त्यामुळे ज्याचा स्पर्श होईल त्याला ते खात सुटते. ✔ जमिनीच्या आत बिळे करून राहण्याची त्याची प्रवृत्ती असते. ✔ त्यामुळे त्याला मातीचा स्पर्श होत राहतो आणि स्पर्श होईल ती माती खात ते सुटते आणि दिवसभरात भरपूर माती खाते. ✔ ती माती त्याची भूक भागवायला उपयोगी नसते. ✔ परंतु टनभर माती खाल्ल्यानंतर त्याची भूक भागण्यास आवश्यक असे थोडे बहुत द्रव्य त्याला त्या मातीतून खायला मिळते. ✔ निसर्गाने त्याच्या पोटामध्ये ती माती पचवण्याची शक्ती निर्माण केलेली आहे. ✔ या निमित्ताने गांडुळ २४ तास वळवळ करत राहते आणि माती उकरून खाते. ✔ त्यामुळे शेतातली जमीन भुसभुशीत होते. ✔ अन्यथा हे काम करायला शेकडो रुपये देऊन ट्रॅक्टर तरी आणावा लागतो, किंवा सहा बैली नांगराने शेत नांगरावे लागते. ✔ तेच काम गांडुळ करत असल्यामुळे जमीन आयतीच भुसभुशीत होऊन तिच्यातून

कापसावरील रोग

Image
कापसावरील रोग कापसावर करपा, मर (फ्युजेरियम विल्ट, व्हर्टीसिलीयम विल्ट न्युविल्ट ऑफ कॉटन) मुळकुजव्या, कवडी, दह्या पानावरील ठिपके,लाल्या, मरोडीया हे रोग प्रामुख्याने आढळतात. १) करपा / Cotton Verticillium-: रोगाची लक्षणे व नुकसानीचा प्रकार : झान्थोमोनॉस कापेस्ट्रिस पी. व्ही मालव्हेसिअरम या जीवाणूमुळे करपा हा रोग होतो. साधारणपणे झाड ५ ते ६ आठवड्याचे असताना पानाच्या खालील बाजूस काळ्या रंगाचे कोनात्मक ठिपके दिसू लागतात. नंतर अशाच प्रकारचे ठिपके पानाच्या वरील बाजूसही तयार होतात. पानाच्या शिरा, पानाचे देठ, काळे पडतात. पानावरील ठिपक्यांचा आकार वाढून ठिपके एकमेकांत मिसळून पुर्ण पान करपून गळून पडते. करप्यामुळे पानातील हरीत द्रव्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कर्बग्रहणाची क्रिया मंदावते. पानाप्रमाणे खोडावरही काळे ठिपके पडतात. खोडाला भेगा पडून झाडे वार्‍याने मोडतात. रोगट झाडावरील पात्या, फुले, कळ्या गळून पडतात. मोठी बोंडे व आतील कापूस सडतो. बोंडावर वरून काळे डाग पडतात. आतील कापसाचा रंग पिवळसर पडून प्रत खालावते. परिणामी बाजारभाव कमी मिळतात. A) रोगाचा प्रसार प्रथम बियाणांपासून होतो. रोगाच

कापूस पिकावरील किड ओळख

Image
कापूस पिकावरील किड व रोगांची ओळख १) मावा : माव्याचा जीवनक्रम :- मावा हा किटक लहान (१ ते २ मिमी ), मऊ शरीर असलेले पिवळसर, हिरवट, तपकिरी किंवा काळसर हिरवट रंगाचे असून झाडाच्या कोवळ्या भागावर आढळतो, ह्या किडीच्या पोटाच्या वरील भागावर दोन सुक्ष्म नलिका असून त्याद्वारे ही कीड चिकट, गोड द्रव बाहेर टाकते. हा द्रव खाण्यासाठी मुंग्या रोपावर आढळतात. ह्या मुंग्याच्या पाठीवर माव्याची पिले बसून ती एका झाडावरून दुसर्‍या झाडावर जातात. ही कीड अंडी घालीत नाही. तिचे प्रजनन संयोगाविना होत असते. माद्या बिन पंखाच्या, आकाराने मोठ्या, फिक्कट रंगाच्या असतात. एक मादी दररोज ८ ते २२ पिलांना जन्म देते. पिले चार वेळा कात टाकून प्रौढावस्थेत जातात. किडीची वाढ ७ ते ९ दिवसात पुर्ण होऊन पौढ मावा २ ते ३ आठवडे जगतो. वर्षभरात १२ ते १४ पिढ्या उपजतात. माव्या पासून होणारे नुकसान :- मावा हा कोवळ्या पानाच्या खालच्या बाजूला समूहाने राहून रस शोषतो. परिणामी झाडे कमजोर होऊन पाने मुरडतात. पानांचा रंग फिक्कट पडतो. माव्याचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास झाडे कापल्यासारखी दिसतात. यामध्ये जुन्या झाडांपेक्षा कोवळ्या झाडांचे नुक