Posts

कापूस पिकातील रसशोषक किडींचे नियंत्रण / Control Sucking Pest on Cotton

Image
☀ कापूस पिकातील रसशोषक किडींचे नियंत्रण ☀ कापूस या पिकाची लागवड महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भात, आणि खानदेशात  मोठ्या प्रमाणावर होते.  कपाशीवर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे,पिठ्या ढेकुण आणि लालकोळी या किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी खालील उपाय योजावेत.   जैविक कीड नियंत्रण Ladybird Beetle - Predators लेडी बर्ड बीटल (ढाल्या कीड) याचे प्रौढ व अळ्या प्रामुख्याने मावा किडीवर उपजीविका करतात. शेतात जर असे मित्रकीटक दिसून येत असल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर शक्यतो टाळावा. लेडीबर्ड बीटलच्या बऱ्याच प्रजाती आहेत . लेडीबर्ड बीटल हि  मावा (Aphids/ अफीड्स ) , पांढरी माशी ( White fly /व्हाईटफ्लाय )  लहान अळी   (Small Caterpillars )     कोळी  (Spider Mite)  या सर्व किडीच्या वर जगते व या किडीची शिकार करते . कपाशीवरील किडींचे नैसर्गिक शत्रू कीटक (मित्रकीटक) जसे कि चतुर,प्रार्थना कीटक, सरफीड माशी, कतीन,पेन्टाटोमिड ढेकुण इत्यादी मित्रकीटकांचे संगोपन करावे. वनस्पतीजन्य किंवा जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. ५ % निंबोळी अ

Water Soluble Fertilizers/ विद्राव्य खते

          विद्राव्य खते विद्राव्य खतांच्या योग्य ग्रेड्‌स पिकाच्या योग्य अवस्थेत वापराव्यात. ही खते आम्लधर्मीय असल्याने ठिबकसंच चोकअप होऊन बंद पडत नाही. बाजारात विविध विद्राव्य खते उपलब्ध असून यात --- 19:19:19, 20:20:00, 12:61:00, 00:52:34, 13:40:13, 00:00:50 +18, कॅल्शियम नायट्रेट.(Calcium Nitrate) अशा विविध ग्रेड्सचा समावेश आहे. 1) 19:19:19 / 💧20:20:00 :--   यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये समप्रमाणात आहेत. या ग्रेडला स्टार्टर ग्रेड असेही म्हणतात. यातील नत्र हा अमाईड, अमोनिअम/अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. या खताचा प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाखीय वाढीसाठी या ग्रेडचा उपयोग होतो. 2)      12:61:0 :--            ******** यामध्ये अमोनिकल नत्र कमी असून पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळांच्या तसेच ( जोमदार शाकीय वाढीसाठी)फळ-फांद्यांच्या वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरूत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो. याला मोनो अमोनिअम फॉस्फेट म्हणतात. 3)   0:52:34 : --        ******* यात स्फुरद

शेताचे क्षेत्रफळ काढणे / Field Area Measurement

Image
शेताचे क्षेत्रफळ काढणे / Field Area Measurement सुत्र:-लांबी × रुंदी ÷ 10000= हेक्टर मधे क्षेत्रफळ उदाहरण समजा चारी बाजुचे माप वेगवेगळे असेल तर पुर्व / East       -:    108 Mtr पश्चिम / West  -:    117 Mtr दक्षिन / South  -:    95  Mtr उत्तर / North   -:    103 Mtr 108 + 117 = 225 ÷ 2 = 112.5 103 + 95  = 198 ÷ 2 =  99 दोन मापाची बेरीज केल्यामुळे 2ने भागावे 112.5 × 99 = 11137.5 11137.5 ÷ 10000 =  1.11 Ha म्हणजे आलेले उत्तर प्रमाणे  क्षेत्र आहे 1.11  

जमीन नांगरून तापू देण्यामागचे शास्त्रीय कारण.

Image
जमीन नांगरून तापू देण्यामागचे शास्त्रीय कारण . भारतात परंपरेने खरीप किंवा रब्बी पिक घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते. या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत साॅईल सोलरायझेशन म्हणतात. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टर किंवा बैल नांगराने एक ते दीड फुट खोल जमीन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ सेल्सियस पेक्षा अधिक तापमान गेले की १५ सेमी खोलपर्यंत जमिनीचे तापमान वाढते. अशा मशागतीमुळे जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात नष्ट होते शिवाय ज्या किडी सुप्त अवस्थेत किंवा कोषावस्थेत जातात त्या नष्ट होतात. जमीन तापल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण सहा पट वाढते. शिवाय जमिनीची इलेक्ट्रीकल कंडक्टीविटी वाढते. तसेच जमिनीतील पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांची घनता वाढते. आपोआपच जमिनीची उत्पादकता वाढते. सूर्य प्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते तशीच ती जमिनीला सुद्धा असते. पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्यक असते, कारण त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. पाऊस पडतो तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोलपर्यंत जात नाही. नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते,

Banana plantations

Image
                                     केळी  

Fertigation फर्टिगेशन

Image
*💧अधिक उत्पादनासाठी फर्टिगेशन तंत्रज्ञान महत्त्वाचे💧* -: पाणी आणि खते या शेतीतील दोन अत्यंत महत्त्वाच्या निविष्ठा आहेत. दोन्ही निविष्ठांचा ठिबक सिंचन पद्धतीमधून वापर केल्याने दोन्ही निविष्ठांची कार्यक्षमता 80 ते 90 टक्के मिळते, त्यामुळे पिकाचे अधिक उत्पादन तर मिळतेच आणि उच्चतम गुणवत्ताही मिळते. त्याचबरोबर वापरामध्ये अनुक्रमे 50 ते 60 टक्के आणि 25 ते 30 टक्के बचत होऊन खर्चामध्येही मोठी बचत होते. राज्यात सुमारे 16 लाख हेक्‍टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन तंत्राचा वापर फळे, भाजीपाला, फुले, नगदी पिके आणि अन्य पिकांसाठी होत आहे. ठिबक सिंचनासोबत पाण्यात विरघळणारी खते वापरण्याच्या तंत्रास फर्टिगेशन तंत्र असे म्हणतात, त्यामुळे रासायनिक खतांच्या वापरामध्ये 25 ते 30 टक्के बचत होते. खतवापर कार्यक्षमता 40 ते 50 टक्के अधिक मिळते. राज्यात द्राक्षे, हरितगृहातील गुलाब, कार्नेशन, जरबेरा, टोमॅटो, ढोबळी मिरची आदी पिकांसाठी पूर्णपणे फर्टिगेशनचा वापर होत आहे, तर डाळिंब, केळी, मोसंबी, संत्रा, पेरू, पपई, ऊस, कापूस या पिकांसाठी विद्राव्य खतांचा वापर केला जात आहे. *फर्टिगेशन का करावे?* राज्यात ठिबक

Bordo Pest बोर्डो मिश्रण रोगनियंत्रणासाठी

Image
  💧बोर्डो मिश्रण💧 पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण हे एक अतिशय परिणामकारक बुरशीनाशक आहे. प्रा. पी. ए. मिलार्डेट यांनी इ.स. 1882 मध्ये प्रथम मोरचूद आणि चुना यांचे मिश्रणाचा वापर फ्रान्समध्ये द्राक्षावरील केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी केला. महाराष्ट्रात अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळझाडे या पिकांवरील बुरशीजन्य रोगांवर एक प्रभावी उपाय म्हणून बोर्डो मिश्रणाचा उपयोग केला जातो. 💧बोर्डो मिश्रण तयार करताना घ्यावयाची काळजी - - कळीचा चुना वापरताना तो दगडविरहित असावा. - मिश्रण करताना कोणत्याही धातूच्या भांड्याचा वापर करू नये. - फवारणी होईपर्यंत प्लॅस्टिक ड्रममध्ये मिश्रण साठवावे. - दोन अलग केलेली द्रावणे एकमेकांत मिसळताना थंड असावीत. - फवारणीसाठी मिश्रण वस्त्रगाळ करून वापरावे. - पावसाळ्यात मिश्रण वापरताना चिकट द्रव (स्टिकर) सोबत वापरावे. - मिश्रण बनविण्यासाठी चांगले पाणी वापरावे. क्षारयुक्त पाणी वापरू नये. - विरी गेलेला चुना किंवा भुकटी वापरू नये. - मिश्रण ढवळताना लाकडी किंवा प्लॅस्टिक काठीचाच वापर करावा. 💧 बोर्डो मिश्रण तयार करण्